Adgaon: Satpuda Manudevi Temple
From Wikipedia, the free encyclopedia
Manudevi Temple is located near Adgaon village in Yawal Taluka in the beautiful natural surroundings of the Satpuda Hills. Manudevi is the kuldevi of 70% people in the Jalgaon district.
In front of the temple there is a nice water fall with breathtaking view. The temple is surrounded by hills on three sides.
The temple is a good Picnic spot. School children and college students are frequent visitors.
Near the temple, a lake has been constructed. The beautiful Hahumaan Temple is also nearby.
महाराष्ट्रात वैभवशाली, संपन्न सांस्कॄतिक, धार्मिक क्षेत्रात आघाडिचा जिल्हा म्हणजे जळगांव जिल्हा होय. जळगांव जिल्ह्याच्या उत्तरेस सातपुडा हा पर्वत असून सुर्यकन्या तापी नदीचा हा भूसंपन्न परिसर. यावल ते अंकलेश्वर महामार्गावर चोपडा ते यावल राज्य रस्त्याच्या चिंचोली किंनगावच्या पश्चिम दिशेला उत्तरेस आंडगाव फाटा आहे. या आंडगाव फाट्यापासून श्रीमनुदेवी तिर्थक्षेत्र अवघे ९ किलोमीटर वर आहे. या आंडगाव फाट्यापासून श्रीमनुदेवी तिर्थक्षेत्राकडे जातांना ६ किलोमीटर वर श्री हनुमानाचे मंदिर आहे. श्री हनुमान मंदिरापर्यंतची सडक हि पक्की डांबराची आहे. श्री हनुमान मंदिराजवळ सुंदर पाझर तलाव आहे.
श्री हनुमान मंदिरापासून श्रीमनुदेवी तिर्थक्षेत्र हे जवळपास ३ किलोमीटर वर आहे. महाराष्ट्र शासनाच्या मदतीने हा ३ किलोमीटरचा कच्चा रस्ता संस्थेने बांधून घेतला आहे. त्यामुळे आता खाजगी वाहने ( टू व्हिलर, आटो रीक्षा, कार, जीप इ. ) थेट मंदिरापर्यंत जाऊ शकतात.

